बेंगळूर/प्रतिनिधी
शेकडो शेतकरी आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते राजधानीत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत बेंगळूरच्या रस्त्यावर उतरले आणि केंद्राने लागू केलेले शेतीविषयक कायदे रद्द करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनादरम्यान बेंगळूर पोलिसांनी कर्नाटकातील कॉंग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या, एस. आर. पाटील, सलीम अहमद आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले. शेती कायद्याविरोधात निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज शहरात ‘राजभवन चलो’ ची हाक दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्यांना राजभवनाच्या दिशेने जात असताना बसमध्ये बसवून शहरातील चामराजपेट येथील शहर सशस्त्र राखीव मुख्यालयात नेण्यात आले.