शिवभक्त सातारकर शिवशिल्पासाठी आग्रही : नगरसेवक विजय काटवटे यांच्या प्रयत्नातून उभी राहतेय शिवसृष्टी
प्रतिनिधी / सातारा
स्वराज्याची चौथी राजधानी सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा म्हणून ओळखली जाते. याच साताऱया नगरीत ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यासाठी नगरसेवक विजय काटवटे यांच्या प्रयत्नातून राजवाडा बसस्थानक परिसरात सुरु आहे. शिवसृष्टी उभी करण्याचे कामास शिवभक्त आणि शिवप्रेमींकडून भक्कमपणे पाठींबा व्यक्त होत आहे. प्रसंगी शिवसृष्टीचे काम पुर्ण होण्यासाठी शिवभक्तांकडून दुग्धाभिषेक त्या शिल्पास करण्याचे नियोजन सुरु असल्याचे समजते.
सातारा शहराला जसा इतिहास आहे. तसाच शहरानजिक असलेल्या किल्ले अजिंक्यतारा व किल्ले सज्जनगडासह जिह्यातील गडकिल्यांना इतिहास आहे. मात्र, काही लोक आपल्या सोयीनुसार इतिहासाकडे पहात असतात. त्याचा अर्थ लावत असतात. सातारा शहरात नगरसेवक विजय काटवटे यांच्या प्रयत्नातून राजवाडा बसस्थानक परिसरात शिवसृष्टी साकारली जाते. त्या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग साकारले जात आहे. असे शिवशिल्प सातारा शहरात उभे राहत असल्याचे स्वागतच शिवभक्त सातारकरांकडून होत आहे. ते लवकर चांगल्या प्रकारे व्हावे, कोणताही अडथळा येवू नये यासाठी शिवभक्तांकडून त्या शिवशिल्पास दुग्धाभिषेक घालण्याचे नियोजन करण्यात आले असून येत्या काही दिवसात शिवभक्त हा कार्यक्रम करणार असल्याचे समजते.
काम चांगले होतेय
सातारा शहरात शिवसृष्टी होण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर सातारा शहरात एक ऐतिहासिक ठेवा पहायला मिळणार आहे. सातारकरांची एक चांगली बाब आहे. चांगल्या बाबींस विरोध करण्याऐवजी पाठबळ द्यावे. आम्ही शिवभक्त भक्कमपणे पाठींशी आहोत.
अभिजीत बारटक्के शिवभक्त : विरोध करु नये ही विनंती
हे ऐतिहासिक असे काम होत आहे. हे काम माहिती घेवून करण्यात येत आहे. चांगले असे काम होत आहे. कोणीही विनाकारण विरोधासाठी विरोध करु नये ही नम्रपणे माझी विनंती आहे.









