ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 4 हजारच्यावर रुग्ण आढळून आले तर बाधितांनी 14.2 लाखांचा टप्पा पार केला आहे. मंगळवारी 4,482 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 265 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 02 हजार 873 वर पोहचली आहे. यामधील 50 हजार 863 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 9 हजार 403 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 13 लाख 23 हजार 899 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 22,111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 84 लाख 07 हजार 486 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 43,915 आरटीपीसीआर टेस्ट आणि 21,089 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत राज्यात 57,805 झोन आहेत. तर 714 कंट्रोल रूम आहेत.