रत्नागिरीतील उक्षी बोगद्याजवळ शनिवारी पहाटे अपघात राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यानं काही काळासाठी कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती घसरलेले इंजिन पुन्हा मार्गस्थ करण्यात अभियंते, कामगारांची कमी वेळात कामगिरी |
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकण रेल्वे मार्गावर उक्षी टनेल नजीक मडगावाकडे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले होते. कोकण रेल्वेच्या मार्गावरून उतरलेले राजधानी एक्सप्रेसचे इंजिन पुन्हा मार्गस्थ करण्यात कोकण रेल्वेला यश आले आहे. कोकण रेल्वेचे अधिकारी अभियंते आणि कामगारांनी अत्यंत कमी वेळात हि कामगिरी केली आहे.
या अपघातामुळे कोकण रेल्वेची सर्व वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. रत्नागिरी रेल्वेस्थानकपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या उक्षी टनेल येथे पहाटे राजधानीचे इंजिन घसरले. ही दुर्घटना घडल्या नंतर कोकण रेल्वे मार्गावरील अपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरी स्थानकात कोचीवली एक्सप्रेस, चिपळूणला कोकणकन्या, संगमेश्वर दरम्यान नागरकोईल एक्सप्रेस, तुतारी एक्स्प्रेस खेडला तर मंगला एक्सप्रेस वैभवावाडीला थांबवून ठेवण्यात आली होती.
मार्गावर बोल्डर पडल्याने इंजिन घसरून हा अपघात झाला होता. त्यावेळी रेल्वेचे सर्व प्रवाशी डबे पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले. या रेल्वेचे प्रवासी डबे टनेलच्या बाहेर असल्यामुळे प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती दिली. कोकण रेल्वेच्या मार्गावरन उतरलेले राजधानी एक्सप्रेसचे इंजिन पुन्हा मार्गस्थ करण्यात कोकण रेल्वे ला यश आले आहे. रेल्वेचे अधिकारी अभियंते आणि कामगारांनी अत्यंत कमी वेळात हि कामगिरी केली.