मुंबई \ ऑनलाईन टीम
१२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु असून भाजपाच्या प्रति विधानसभेतील माईक काढून घेण्यात आला. बाहेर ही कारवाई सुरु असताना आमदार रवी राणा यांनी सभागृहात येत संधी साधून राजदंड पळविला.यावर भास्कर जाधव यांनी त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश देत काही फरक पडत नसल्याचे सांगितले.
आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा व्हावी असे निवेदन थेट अध्यक्षांना देण्याचा प्रयत्न करत होते. पण असे निवेदन थेट देता येत नाही. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चेच्यावेळी आपण सहभाग घ्यावा असेही भास्कर जाधव यांनी सांगितले. पण रवी राणा यांनी त्यावेळी राजदंड पळवला. पण राजदंड पळवला म्हणून कामकाज थांबणार नाही, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा असून त्यावेळी तुम्ही सहभागी व्हा असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांबाबतची भूमिका आणि स्टंटबाजी यांच्यातील फरक हा विधानसभा सदस्यांनी ओळखावा असेही जाधव म्हणाले. रवी राणा यांच्यासारख्या आमदारांचा हेतू हा चर्चा करायचा नाही, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे. पण त्यासाठी चर्चेचा वेगळा वेळ ठेवला आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले. त्यामुळे स्टंटबाजांकडे लक्ष देऊ नका असेही भास्कर जाधव यांनी यावेळी सुचवले.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








