साहित्य : एक वाटी राजगिरा, पाव वाटी शेंगदाणे, दोन ते तीन चमचे तूप, एक वाटी चिक्कीचा गूळ
कृती : जाड बुडाच्या कढईत मध्यम आचेवर शेंगदाणे खरपूस भाजून ताटात काढावेत. गार झाले की साल काढून मिक्सरला भरडसर वाटावे. आता मध्यम आचेवर कढई गरम करून त्यात दोन ते तीन चमचे राजगिरा टाकून फुलवून घ्यावेत. कढई जर गरम झाली नसेल तर राजगिरा फुलणार नाहीत. मात्र राजगिरा फुलवताना राजगिरा एकसारखा हलवत उष्णता नियंत्रित ठेवावी. राजगिरा करपू देऊ नये. राजगिरा थंड झाल्यावर जे दाणे फुलत नाहीत ते चाळणीने चाळावेत. आता मंद आचेवर भांडय़ात पाणी गरम करावे. नंतर त्यात किसलेला गूळ घालून पूर्णपणे वितळवून त्याचा पाक बनवावा. नंतर त्यात शेंगदाणा कूट आणि राजगिरा घालून मिश्रण मिक्स करावे. आता आच बंद करून मिश्रण थोडे गार होण्यास ठेवावे. हाताला तूप लावून लाडू वळावेत.
टीप : मिश्रण थोडे गरम असतानाच लाडू वळावेत.









