पुणे \ ऑनलाईन टीम
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महामार्गांसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या प्रश्नांवर बोलताना राजकारण्यांवर सडकून टीका केली. राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यातच अडकले आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप केलाय. तसेच पुनर्वसनात योग्य मोबदला मिळण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिलाय.
आज पुण्यातील रिंग रोडच्या आंदोलनाप्रसंगी त्यांनी भूमिका मांडली असून ते म्हणाले की, महाराष्ट्रात आज जे काही चालले आहे. ते शोभणारे आहे का? एका थोबाडीत शब्दावरून किती चर्चा चालली आहे आणि इकडे काय चाललं आहे. याची काही चिंता, परवा नाही. मुख्यमंत्र्यांना एक सांगू इच्छितो, प्रकल्पांना विरोध का होतो? एक म्हणजे पर्यावरणाच्या अंगाने, तर दुसरे म्हणजे पुनर्वसनाच्या अंगाने होतो. तुम्ही पुनर्वसनाची योजना तरी दाखवा ना.पण तुम्ही एकच सांगता पैसे घ्या आणि गप्प बसा.सरकारची कोणतीही योजना असू द्या, त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे, हे गडकरी का विसरत आहेत? तुम्ही अनेक ठिकाणी रस्ते करत आहात. त्यामध्ये केवळ शेतकरी विस्थापित होत नसून सर्वसामान्य नागरिक देखील विस्थापित होत आहेत.
नितीन गडकरींनी रस्त्यांसाठी भूसंपादन केल्यावर पुनर्वसनासाठी योजना आणायला हवी. त्यांनी गावागावात फिरावं. मी त्यांना घेऊन फिरेल. यावेळी एकही शेतकरी दगड मारणार नाही याची जबाबदारी मी घेतो, अशी भूमिका बाबा आढावा यांनी पुण्यात मांडलीय.
आता पुण्यात रिंगरोड केला जाणार आहे. रस्ता बंदिस्त होणार आहे तर दुसर्या बाजूला शहरात मेट्रो भुयारी मार्गाने आणत आहे. मग इथे असा का रोड केला जात आहे? यामुळे ६ तालुक्यातील ८४ गावावर याचा परिणाम होणार आहे. हे सर्व अदानी आणि अंबानी यांच्यासाठी चालले आहे, असे देखील बाबा आढाव यावेळी म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








