प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर पसरले आहे. काल ज्याला आपण भेटलो तो दुसऱया एक दोन दिवसात नसतो, अनेक कुटूंबातल्या लोकांना वेदनेला सामोरे जावे लागते. आज एकच मागणी मागतो देवी या सगळ्या राज्यकर्त्यांना बुद्धी दे, सांगा त्यांना ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय त्या लोकांची काळजी घ्या, अशी विनवणी खासदार उदयनराजे यांनी भवानी देवीकडे केली.
भवानी तलवार पूजनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले, कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर पसरले आहे.त्यामुळे वाईट वाटत की रूढी, परंपरा सण साजरे करतात.एक जिव्हाळा असतो या सणाच्या माध्यमातून पै पावणे मित्र मंडळी एकत्र येतात. आज ते पण कोरोनाने हिसकावून घेतले आहे.लस निघेल किंवा नाही निघेल मला माहित नाही.आज आई भवानी चरणी महाराजांच्या चरणी एकच सांगतो हे कुठे तरी थांबले पाहिजे, वाईट वाटत, काल ज्याला भेटलो तो दुस्रया एक दोन दिवसात नसतो, अनेक कुटूंबातल्या लोकांना वेदनेला सामोरे जावे लागते.काय सांगू असे प्रत्येकावर क्षण आलेत.त्यात मी काय अपवाद नाही. बुद्धी काम करायची बंद झाली. यासाठी प्रत्येकांनी आपली काळजी घ्या, आणि त्याच बरोबर जे संपूर्ण खासदार असतील सगळे पक्ष विरहित किंवा आमदार देश भरातील त्यांचे संपूर्ण दोन वर्षाचा निधी तुमच्याकडे वर्ग करून घेतला त्यामुळे लोक आम्हाला विचारात.मला असं वाटत की लोकप्रतिनिधी या नात्याने लोक प्रतिनिधी सोडून द्या सामान्य माणूस म्हणून मला ही प्रश्न पडतो.आज हे पैसे मला माहित नाही किती? एवढे सगळे घोटून घेतल्यानंतर केंद्र शासन असेल राज्य शासन असेल मी महाराष्ट्र पुरत मर्यादित बोलत नाही.पैसे गेले कुठं?, दिवस रात्र फोन येतात ते एकच विचारतात बेड पाहिजे, ऑक्सिजन व्हेंटिलेटर, एवढे पैसे घोटून घेतले गेले कोठे?, गोरगरीबाना का सुविधा मिळत नाहीत?.याच उतर केंद्र आणि राज्य शासनाने देणं गरजेच आहे.लोकानी जाब विचारण गरजेच आहे. गरीब लोक झोपडपट्टीत राहतात ते मला येऊन भेटतात.काय करायचं?, अंत्यसंस्कार तयारी करतो म्हणतात, थोडी लाज जर राज्यकर्त्यांना असते तर कुठून पैसे आणणार, का तरतूद केली नाही.कोठून चार पाच लाख त्यांच्याकडे येणार, दारिद्र्य रेषेखालील लोकांच्याकडे.देवी या सगळ्या राज्यकर्त्यांना बुद्धी दे, सांगा त्यांना ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय त्या लोकांची काळजी घ्या. अजून काय बोलू, संताप येतो काय करायचं. तुम्हाला मतदान करतात एवढी माफक अपेक्षा का करू नये त्यांनी. विश्वास ठेवतात तुमच्यावर.विश्वासास पात्र नाही तर पदावर राहायची लायकी पण नाही. त्यांना लागू होत तसं मला ही लागू होत, कधी कधी नाही नेहमीच वाटत करतोय काय आपण?,कोरोनाचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले.तुम्ही राबवणार कशी यंत्रणा?,महसुलचा काय संबंध हा पैशाचा खेळ चालला आहे.कुठे जातात पैसे तपासले पाहिजेत लोक दररोज मृत्यू मुखी पडतात जबाबदार कोण?,अशीच परिस्थिती लोकप्रतिनिधीच्या कुटूंबावर आली तर काय करणार, कोणावर ही अशी वेळ येऊ नये अशी देवी चरणी प्रार्थना करतो पण मग काय? त्यांना काय कळत नाही. त्या महसूल विभागाचा आणि मेडिकल विभागाचा काय संबंध, प्रांत असतील जिल्हाधिकारी असतील काय संबंध, तुम्ही डॉक्टराना घ्या, फिजिशियन सर्जन यांना 80 हजार पगार आहे तेथे करा ना अडीच तीन लाख.आमदार, खासदार यांचं जस कुटूंब तसं डॉक्टर यांचं ही कुटूंब आहे.
एक दिवस लांब नाही..मला माहिती आहे.ह्यांच्या हलगर्जीपणा मुळे निर्णय क्षमता नसल्याने ते म्हणत असतील ह्याला काय कळत नाही.मला कळत. ते पैशाचा विचार करतात मी ह्रदयातन विचार करतो, भावनेचा विचार करतो.मला काय पडलं नाही.असलं हिंमत तर येऊ द्या समोरासमोर, सांगू द्या ना. माझं कोणी दुष्मन नाही त्या लायकीच कोणी नाही ते विरोधक समजत असतील मला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही, अशा शब्दात त्यांनी मत व्यक्त केले.









