गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार समारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
मार्केट यार्ड येथील राज्य राखीव दलाच्या सहाव्या तुकडीचे पथसंचलन मंगळवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. एपीएमसी रोडवरील पोलीस परेड मैदानावर गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. राखीव दलाचे बेळगाव येथील कमांडन्ट हंजा हुसेन यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.
राज्य पोलीस महासंचालक प्रवीण सूद व अतिरिक्त पोलीस राज्य महासंचालक (राखीव दल) अलोककुमार हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. सोमवारी सकाळी माहिती खात्याच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. मंजित, एम. पी. यडाल, प्रशांत कुंदरगी आदी उपस्थित होते.
मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 पर्यंत मच्छे येथील राज्य राखीव दलाच्या बटालीयनमध्ये केएसआरपी उत्सव होणार आहे. पोलीस दलातील कलाकार या उत्सवात भाग घेणार आहेत. वरि÷ अधिकाऱयांबरोबरच पोलीस आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता अलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅलीचे आयोजित करण्यात आले आहे. सुवर्णसौधपासून मच्छे येथील राखीव दलाच्या दुसऱया बटालीयनपर्यंत ही रॅली जाणार आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी राणी चन्नम्मा चौक परिसरात पोलीस बॅन्डचे कार्यक्रम झाले. वेगवेगळय़ा बटालीयनमधून आलेल्या पोलीस दलातील कलाकारांनी सुंदर गीते सादर केली. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमिवर वरि÷ पोलीस अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. सोमवारी सायंकाळी अलोककुमार यांच्या हस्ते राणी चन्नम्मा पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, कमांडन्ट हंजा हुसेन आदी अधिकारी उपस्थित होते.









