ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेना खासदार संजय राऊत आता शिवसेना वाढविण्याचे काम करत नाहीत. त्यांचे लक्ष उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. त्यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे, असा गौप्यस्फोट भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन हटवा. तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी सुपारी राष्ट्रवादीने संजय राऊत यांना दिली आहे. त्यामुळे राऊतांचं लक्ष आता उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर आहे. उद्धव ठाकरे जेव्हा सरकार स्थापनेबाबत पहिल्यांदा शरद पवारांना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. ते नाही तर मी. काय स्वार्थी प्रवृत्ती आहे. राऊतांची संपूर्ण कुंडली माझ्याकडे आहे. उद्धव ठाकरेंना हे कळत नाही की राऊत सुरुंग लावत आहेत.
संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं त्यांनी सोडलं नव्हतं. राऊत आता पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल पत्रकार परिषदेत अस्वस्थ का झाला, प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला आहे, असा घणाघातही राणेंनी केला.








