दरवषी 10 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
राऊंड टेबल इंडिया, आरटीआय क्लब, बीसीआरटी 237 क्लबकडून बेळगाव जिल्हय़ातील शिक्षणरहित विद्यार्थ्यांसाठी मदत मिळून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी राऊंड टेबलने घेतली आहे. त्यासाठी विविध राज्यात रॅली काढून निधी गोळा करण्याच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
राऊंड टेबलतर्फे दरवषी 10 गरीब व गरजु विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची जबाबदारी घेत असतात. यावषीही या क्लबने पुढील 10 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली असून, त्याच्या धनादेश गोळा करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 8 राऊंड टेबल सदस्य यांनी या रॅलीची शुक्रवारी सकाळी आरपीडी येथून सुरूवात केली.
सदर रॅली बेळगाव, कोल्हापूर, इचलकरंजी, मुंबई, बडोदा, अहमदाबाद, ओसीन, जोधपूर, उदयपूर, सुरत, पुणे मार्गे बेळगाव येथे शेवट होणार आहे. या रॅलीचे उद्घाटन एरिया चेअरमन अंकेश जैन, हिमान्शु, सचिव तुषार, दिलीप चिंडक, आनंद हेडा, रोहित देसाई, सुरज मोहिरी, राज दोड्डणावर आदी मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. या रॅलीत रौरव देसाई, श्रीनिवास रायबागी, सिद्धार्थ हेड्डे, द्रुव पटेल, अजिंक्मय, राहुल रायबागी, सुदर्शन जाधव व नंदन भंडारी हे या रॅलीचे सभासद असून, जवळपास 3500 कि. मी. अंतर विविध ठिकाणी जाऊन हा धनादेश गोळा करून दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना ते धनादेश वाटप करण्यात येणार आहे.









