रांची
तामिळनाडूमध्ये घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची घटना ताजी असतानाच झारखंडची राजधानी रांचीमध्ये नुकतीच मोठी दुर्घटना टळली. येथील बिरसा मुंडा विमानतळावर एअर एशियाच्या विमानातून तेलाची गळती झाली. मुंबईहून रांचीला येणारे एअर एशियाचे विमान सकाळी 11.25 वाजता बिरसा मुंडा विमानतळावर उतरले होते. लँडिंगनंतर विमान ऍप्रनवर पोहोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली. विमानात 110 प्रवासी होते. विमानाच्या लँडिंगवेळी ब्रेक लावताना प्रवाशांना जोरदार धक्का लागल्याने हा प्रकार लक्षात आला.








