प्रतिनिधी / मडगाव
रांची, झारखंड येथे 25, 26 आणि 27 फेब्रुवारीला एक भारत श्रे÷ भारत उपक्रमाच्या अंतर्गत पूर्व विभागीय सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित कार्यक्रमात गोमंतकातील लोकरंग, कुडचडे हा युवा लोककलाकारांचा चमू प्रतिनिधीत्व करणार आहे. संजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गोमंतकातील 30 युवा कलाकार गोमंतकीय लोकसंगीत व लोकनृत्यांचा आविष्कार सादर करणार आहेत. कुणबी, कळशी, फुगडी, देखणी, मोरुलो, वीरभद्र, तालगडी हे गोमंतकीय लोककला प्रकार हा चमू सादर करणार आहे.
सिद्धी परीट, मंजिता मडगावकर, वैष्णवी गावकर, मनीषा सुतार, दिव्यता नाईक, तनिष्का पाटील, सुजाता देसाई, साक्षी परीट, ओंकार नाईक, शाणू देसाई, शुभम पागी, गजेन देसाई, कृतिक्ष नाईक, तुषार भोईटे, पवन नाईक, सौरभ नाईक, गितेश नाईक, रोहन गावणेकर, सुरजकुमार मोहंता हे कलाकार लोकनृत्ये सादर करणार. तर सिमरन राऊत, सर्वंकष बेतोडकर, ऋषिकेश वेळीप, अमोल सावंत देसाई, मंगेश हरिजन हे कलाकार लोकगीते सादर करतील. युवराज नाईक, साईश नाईक, श्रेयश सिरसाट, समर्थ नाईक, रूदेश शिरोडकर, अनुज प्रभुदेसाई हे कलाकार लोकवाद्यांवर साथसंगत करणार आहेत.









