बेळगाव प्रतिनिधी
जय हिंदचा नारा देत तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दुंगा, ही स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित करणाऱया नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आणि जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे कधीच इतिहास रचू शकत नाहीत, हे बोल असलेल्या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची रांगोळी रेखाटून त्यांना अभिवादन केले.









