खासदार शरद पवार यांचेकडे दिला धनादेश
प्रतिनिधी/सांगली
सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध रांगोळीकार आदमअल्ली मुजावर यांनी लॉकडाऊन काळात विविध महात्म्यांची चित्रे रंगवली होती. त्यांनी या चित्राची नुकतीच विक्री करून जमा झालेला 51 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री कोरोना निधीला देऊ केला. हा धनादेश जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांचेकडे सोपवण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, खा. श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते. आदमअल्ली यांनी भव्यदिव्य रांगोळीची विश्वरेकाँर्डस् केली असून ते कळंबी येथे अजितराव घोरपडे शाळेत शिक्षक आहेत.
Previous Articleसांगली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महिलांना संधी द्या
Next Article संघाचे जेष्ठ प्रचारक श्री.बाबुराव देसाई यांचे निधन








