बॉलिवूडमधल्या 80-90 च्या दशकातल्या अनेक अभिनेत्री आजही खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. पन्नाशी, साठी ओलांडलेल्या या अभिनेत्रींचं वय आपल्या लक्षातही येत नाही. अशीच एक तंदुरुस्त अभिनेत्री म्हणजे संगीता बिजलानी… संगीता 61 वर्षांची आहे. मात्र तिच्याकडे बघून तिच्या वयाचा अंदाजच येत नाही. फिट राहण्यासाठी, तरुण दिसण्यासाठी संगीता बरंच काही करते. तिच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेऊ.
संगीता नियमित व्यायाम करते. तंदुरुस्त राहण्यासाठी ती जीममध्ये घाम गाळताना दिसते. संगीता इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचे व्हिडिओ शेअर करते. वयाच्या 61 व्या वर्षीही ती खूप कठीण व्यायाम करते. मध्यंतरी तिने टीआरएक्स ऍब्ज व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्यायाम इतका सोपा नसल्याचं तिने म्हटलं होतं आणि हा व्हिडिओ बघितल्यावर आपल्या हे लक्षातही येत होतं. या व्यायामामुळे हृदयाला बळकटी मिळते. इतकंच नाही तर पाठीचा कणाही मजबूत होतो. यासोबतच संगीता इतर व्यायामप्रकारही करत असते. स्क्वॉट्स, पुलडाउन, लंजेस हे व्यायाम ती करते आणि त्याचे व्हिडिओही शेअर करते.









