हुपरी/प्रतिनिधी
सासू मयत झाल्याने अंत्यविधीसाठी कर्नाटक मध्ये जात असताना कागल हुपरी रोडवर सूतगिरणी समोर थांबलेल्या डंपरला पाठीमागून मोटारसायकलची जोरदारपणे धडक होऊन जागीच एक ठार व दोन गंभीर जखमी झाले.शशिकांत रंगराव बोडके(वय55रा. कळंबा ता. करवीर)असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. जखमींना ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान डंपर ड्राव्हर गणेश शिवाजी पोवार(रा. कासारडे ता. कणकवली) याला हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून डंपर जप्त करण्यात आले आहे.
हुपरी पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी की कळंबा ता. करवीर येथील शशिकांत रंगराव बोडके हा सासू वारल्याची वार्ता कळताच बुधवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास पत्नी व मुलगा यांना बरोबर घेऊन मोटारसायकल नंबर MH07–V-7074 या गाडीने कर्नाटक मध्ये गावी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून कागल ते हुपरी मार्गे जात असताना कालव्याजवळ सूतगिरणी समोर वाळूने भरलेला अशोक लेलँड डंपर नंबर MH07-AJ-2273 हा रस्ता चुकल्याने उभा होता परंतु अंधार असल्याने डार्क डेंजर लावलेला नव्हता. .मोटारसायकल स्वार लवकर अंत्यविधीला पोहचण्यासाठी रिकाम्या रस्त्यावरून गाडी जोरात हाकत होता. पहाटेच्या वेळी अंधार असल्याने जोरदारपणे असलेली गाडी त्या थांबलेल्या डंपरला धडकून खाली पडली . त्यावेळी शशिकांत बोडके हा जागीच ठार झाला व पत्नी, मुलगा गंबीर जखमी झाल्याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दुःखद घडलेल्या घटनेच्या ठिकाणी जात असलेल्या इसमाचा रस्त्यातच अपघात होऊन ठार झाल्याने कळंबा व हुपरी गावातील नागरिक हळहळ व्यक्त करीत होते. डंपर ड्राव्हर गणेश शिवाजी पोवार(वय25रा.कासारडे ता. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग )याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व डंपर जप्त करण्यात आला आहे.








