सातारा
प्रतिनिधी
जावली तालुक्यातील वागदरे येथील चर्मकार समाजास रस्ता मिळावा म्हणून अनेक वेळा प्रशासनाचे पत्रव्यवहार करून देखील प्रशासन दखल घेत नाही.त्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाईच्यावतीने निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात रिपाई एचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, जिल्हा सचिव किरण बगाडे, चर्मकार संघटनेचे अध्यक्ष दिगंबर कांबळे, जावली अध्यक्ष अमित साळुंखे, युवा अध्यक्ष अभिजीत भोसले तसेच वाघदरे उपस्थित होते. चर्मकार समाजातील शंकर चव्हाण, ज्ञानदेव चव्हाण, सुनील चव्हाण, प्रियांका चव्हाण ग्रामपंचायत सदस्य वाघदरे दर्शना चव्हाण, नंदा चव्हाण व इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, वागदरे ता. जावली येथील चर्मकार समाजाच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत अनेक वेळा प्रशासनाचे पत्रव्यवहार करून देखील प्रशासन दखल घेत नाही म्हणून भारत स्वतंत्र झाल्यापासून गेली सत्तर वर्षे झाले तरीसुद्धा चर्मकार समाजाला आजअखेर हक्काचा रस्ता नसल्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी, बाजारहाट , मुले शाळेत जाण्यासाठी, वयोवृद्ध महिला गरोदर महिला, या सर्व लोकांना अनेक गोष्टीचा त्रास सहन करावा लागत होता मात्र गावातील स्थानिक राजकीय गोष्टीमुळे चर्मकार समाजाला योग्य तो न्याय मिळत नाही. तसेच म.श्वर मधील बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या मुख्याधिकारी व नगररचना अधिकारी यांच्यावर कारवाई करावी म्हणून निदर्शने करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









