प्रतिनिधी/ सातारा
शहरातील रस्त्यावर, चौकात गेल्या काही दिवसपासून टवाळखोरांकडून भाई का बडे म्हणत नेहमीच वाढदिवस साजरी करण्यात येतात. असा वाढदिवस रविवारी सदरबझार येथील सुमित्राराजे उद्यानासमोर साजरी करण्यात येत होता. यांची माहिती शहर पोलिसांना मिळताच हा वाढदिवस साजरा करणाऱया 16 जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदरबझार या भागात रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व दोन बीट मार्शल पेट्रोलिंग करत होते. यावेळी सुमित्राराजे उद्यानाच्या समोर ऋतिक जितेंद्र शिंदे (रा. गोडोली), अक्षय सुनिल जाधव(रा. करंजे), सागर चंद्रकांत साळुंखे(रा. कृष्णानगर खेड), प्रितम अनिल चव्हाण(रा. जुना आरटीओ चौक), दिनेश राजेंद्र निकम(रा. विकासनगर खेड), सुरज शंकर साळुंखे(रा. तडवळे ता. कोरेगाव), संकेत प्रल्हाद शिंदे(रा. रणशिंगवाडी ता. खटाव), पुरूषोत्तम नारायण भोसले(रा. विकासनगर खेड), अक्षय संजय जातक (रा. वर्णे ता. सातारा), प्रविण अशाक खडपद(रा. सदरबझार), गौरव पांडुरंग मोरे(रा. कारी ता. सातारा) व 5 ते 6 जण रस्त्यावर मोटार सायकल उभी करून केक कापत होते. हे लक्षात येताच पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी नियमांचे उल्लघंन करणाऱया 16 जणांना ताब्यात घेत त्यांची 9 वाहने जप्त केली आहेत. त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस नाईक खाडे, कर्णे, भोसले, पोलीस कॉन्स्टेबल सोनावणे, निकम, महिला पोलीस शिपाई झुंझार यांना घेतला.








