ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगुनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये वाहतूक विषयक नियम,रस्त्यावरील सुरक्षित प्रवासासाठी प्रतिज्ञा करण्यात आली.
राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिन्याअंतर्गत केंद्रीय वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यामध्ये हेल्मेट वापर, सिट बेल्टचा वापर, गाडी चालविताना फोनचा वापर न करणे, मद्यसेवन करुन गाडी न चालवणे, अपघातग्रस्तांना मदत करणे या विषयी जागृती करण्यात आली. विद्यार्थी, प्राद्यापक सहभागी झाले होते.








