प्रतिनिधी / बेळगाव :
शहर आणि परिसरात काही अज्ञातांकडून घडविण्यात येणाऱया प्रकारांमुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. शहराच्या उपनगरीय भागात रस्त्यात नोटा टाकणे तसेच काही संशयितांकडून मास्कची विक्री होणे असे प्रकार वादाच्या भोवऱयात सापडत आहेत. याचे प्रत्यंतर गुरूवारी शहराच्या तसेच ग्रामीण भागात आले आहे.
वडगाव येथे लक्ष्मीनगर भागात 100 आणि 500 रूपयांच्या नोटा रस्त्यात पडल्याचे नागरिकांना आढळून आले. या नोटा काही अज्ञातांनी जाणून बुजून टाकल्या असल्याची भिती व्यक्त झाली. नागरिकांनी या नोटा जाळून टाकल्या. तसेच या प्रकाराबद्दल पोलीस यंत्रणेला माहिती देखील दिली. मात्र अशा प्रकारांवर अंकूश ठेवण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
येळ्ळूर येथे संशयीतांचा वावर
येळ्ळूर येथे मास्क विक्रीच्या बहाण्याने गावात दाखल झालेल्या दोन संशयितांमुळे काहीवेळ गोंधळ उडाला होता. या विपेत्यांना तुम्ही कोठून आला आहात असा प्रश्न विचारला असता त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्याबरोबर वाद घातला. तसेच त्यांना माघारी धाडले. पोलीस खात्याने अशा व्यक्तींच्या बाबतीत विशेष दक्षता घेऊन पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.









