गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ठरतोय अपयशी
प्रतिनिधी / बेळगाव
बॅरिकेड्स घालून रस्ते बंद करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. परंतु रस्ते बंद करताना सांगोपांग विचार करून कार्यवाही होणे आवश्यक आहे. संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्बंध घालण्यात आला. परंतु त्यामध्ये सुद्धा अनेक विसंगती आहेत.
प्रशासनाने पहिले रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद केले आहे. त्यातच बॅरिकेड्स घालून रस्ता रहदारीसाठी पूर्ण बंद केला आहे. परिणामी सर्व वाहतूक दुसऱया रेल्वेगेटातून होत असून या ठिकाणी वाहतुकीवर ताण पडत आहे. एकच महत्त्वाचा रस्ता राहिल्याने या ठिकाणी दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक करणाऱया ट्रक मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे दुसरे रेल्वेगेट ते अनगोळ नाका, काँग्रेस रोड दुतर्फा तसेच
व्हॅक्सिन डेपोपर्यंत लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच सकाळच्या वेळेत खरेदीसाठी दिलेल्या सवलतीमुळे गर्दीत वाढ होत आहे.
तासन्तास गर्दीतून मार्गस्थ होताना विलंब लागतो. सामाजिक अंतराचा नियम बाजूला पडतो. त्यामुळे संसर्गाचा फैलाव होण्याची शक्मयता निर्माण होते. यासाठी पहिले रेल्वेगेटसुद्धा वाहतुकीसाठी खुले करावे व दुसऱया रेल्वेगेटवरील ताण कमी करावा, अशी मागणी होत आहे.









