टेलिफोन कार्यालयाकडून फिश मार्केटकडे वळण्यास बंदी घालण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
ग्लोब थिएटरजवळील ट्राफिक सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. मात्र ग्लोब थिएटरपासून पोस्टमन सर्कलकडे जाणाऱया रस्त्यावर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे रस्त्याला पार्किंग तळाचे स्वरुप आले आहे. रस्ता वाहतुकीकरिता बंद ठेवण्यात आल्याने वाहनधारकांची तारांबळ होत आहे. टेलिफोन कार्यालयाकडून फिश मार्केटकडे वळण्यास बंदी घालण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
खानापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने या मार्गावरील वाहतूक कॅम्पमार्गे वळविण्यात आली होती. रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना ग्लोब थिएटर समोरील चौकामधून पोस्टमन चौकात जाण्याचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. टेलिफोन कार्यालयासमोरून फिश मार्केटकडे वळण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पण सदर बॅरिकेड्स अद्याप हटविण्यात आले नाहीत. परिणामी वाहनधारकांना अडचणीचे बनले आहे. कॅम्पमधून पोस्टमन चौकाकडे जाण्याचा रस्ता बंद ठेवल्याने वाहनधारकांना प्रणाम हॉटेलच्या बाजूने जावे लागत आहे. मात्र या रस्त्यावर खासगी वाहने पार्क करण्यात येत असल्याने रस्त्याला पार्किंग तळाचे स्वरुप आले आहे.
टेलिफोन कार्यालयाकडून फिशमार्केटकडे वळण्याच्या ठिकाणी दुभाजकावर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पोस्टमन चौकामधून किंवा टेलिफोन कार्यालयाकडून फिशमार्केट किंवा कॅम्पमध्ये जाणाऱया वाहनधारकांना गोगटे चौकात वळसा घालून जावे लागत आहे. या ठिकाणी वाहतूक मोठय़ा प्रमाणात असल्याने वळसा घालणाऱया वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. शंभर मीटर अंतर गाठण्यासाठी वाहनधारकांना एक किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. गोगटे चौकाकडून येणाऱया वाहनधारकांना ग्लोब थिएटरसमोरील चौकात उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. परिणामी टिळकवाडीकडून येणाऱया वाहनधारकांना पोस्टमन चौक किंवा पाटील गल्ली तसेच कॅन्टोन्मेंट कार्यालयाकडे जायचे असल्यास फिश मार्केटसमोरून वळसा घालावा लागत आहे.
रहदारी पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी टाळण्यासाठी ग्लोब चौकात बॅरिकेड्सची उभारणी करून वाहतूक वळविण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा चौक वाहनधारकांसाठी गैरसोयीचा बनला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील विद्यार्थी कॅम्प परिसरातील शाळांमध्ये शिक्षण घेत असतात. त्यामुळे पालक व रिक्षा ग्लोब थिएटरसमोरील चौकामधून कॅम्पमध्ये ये-जा करीत असतात. पण या ठिकाणी रस्ता बंद करून पार्किंग करण्यात आल्याने पालक आणि शाळकरी रिक्षाचालकांची गैरसोय होण्याची शक्मयता आहे. शहरवासियांसह कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना आणि कार्यालयातील कर्मचाऱयांची गैरसोय होत आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध चौकात ट्राफिक सिग्नल बसविण्यात आले असून, काही ठिकाणचे सिग्नल कार्यान्वित करण्यात आले आहेत. ग्लोब थिएटरजवळ चार रस्ते मिळत असल्याने नेहमी वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्राफिक सिग्नल सुविधा बसविण्यात आली आहे. सदर सिग्नल सुविधा अलीकडेच कार्यान्वित करण्यात आली असून, सुरळीत रहदारीसाठी उपयोगी ठरण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सिग्नल बसविण्यात आलेल्या ग्लोब थिएटर चौकामधून पोस्टमन चौकाकडे जाणाऱया रस्त्यावरील बॅरिकेड्स हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.









