प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील रसुलवाडी येथे विहिरीत पडल्याने लतीका काशीनाथ जाधव (वय ६६) या वृद्धेचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. पहाटे सदर वृद्धेचा मृतदेह आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांनी बाहेर काढला. मिरज ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला.
रसुलवाडी येथे एका शेतातील विहीरीत वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांना पाचारण करून मृतदेह बाहेर काढला. सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला.
शेतातून चालत जात असताना सदर वृद्धा पाय घसरून पडली असल्याची शक्यता मिरज ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केली आहे. आयुष हेल्पलाईन टीमप्रमुख अविनाश पवार मुस्ताक बोरगावकर, चिंतामणी पवार, अल्लतमेश पट्टणकुडे यांनी गळाच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला.








