ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याची घाणेरडी सवय आहे. त्यांनी वेगळ्याच नावांची परवानगी घेऊन मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याचा खळबळजनक आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
एखाद्या व्यक्तीचा फोन टॅप करण्यासाठी राज्यातील गृह विभागाच्या मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागते. रश्मी शुक्लांनी कोणतीही परवानगी घेतली नाही. याबाबत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी उत्तर दिले आहे. शुक्ला यांना फोन टॅपिंगची घाणेरडी सवय आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळातही त्यांनी एकदा असा प्रकार केला होता. तेव्हा एक पत्र उघडकीस आल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती, असे आव्हाड यांनी सांगितले.
शुक्ला यांनी कोणतेही नियम न पाळता केलेले फोन टॅपिंग हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. आता रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगचा उपयोग महाविकास आघाडी सरकारविरोधात केला जात आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.
दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर चर्चा झाली. याबाबत अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








