कोरोना लसीसंदर्भात अमेरिकेनंतर रशियातून चांगले वृत्त समोर आले आहे. स्पुतनिक-5 ही लस तयार करणाऱया नॅशनल रिसर्च सेंटर (आरडीआयएफ)ने लस रुग्णांवर 92 टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी ठरल्याचा दावा केला आहे. यापूर्वी अमेरिकन कंपनी फायजरने स्वतःची लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा केला होता. रशियाच्या लसीच्या चाचणीत 40 हजार स्वयंसेवकांना सामील करण्यात आली होती.
यातील 16 हजार जणांना लस देण्यात आली. त्यानंतर 21 दिवसांपर्यंत त्याचा प्रभाव पाहण्यात आला. 20 रुग्णांमध्ये लसीच्या दुसऱया डोसने 92 टक्क्यांपर्यंत प्रभाव दर्शविला आहे. ही चाचणी बेलारुस, संयुक्त अरब अमिरात, व्हेनेझुएलासह भारतात दुसऱया तसेच तिसऱया टप्प्यात सुरू आहे.









