रशिया आणि मेक्सिको या देशांमध्येही कोरोना विषाणूच्या नव्या स्वरुपामुळे बाधित रुग्ण सापडले आहेत. या संकरावतारासंबंधी सर्वप्रथम ब्रिटनमध्ये शोध लागला होता. याचे रुग्ण आता 40 पेक्षा अधिक देशांमध्ये सापडले आहेत. विदेशातून आलेल्या एका व्यक्तीमध्ये विषाणूचा नवा संकरावतार ‘बी117’ ची पुष्टी झाल्याची माहिती मेक्सिकोच्या तमौलिपास राज्याच्या आरोग्य सचिव ग्लोरिया मोलिना गंबोआ यांनी दिली आहे. बाधितासोबत प्रवास करणारे लोक तसेच विमानाच्या चालक दलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर मेक्सिकोच्या अध्यक्षांचे प्रवक्ते जीसस रामिरेज क्यूवास यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. याचप्रकारे रशियाने नव्या स्ट्रेनच्या पहिल्या रुग्णाची पुष्टी केली आहे. हा रुग्ण ब्रिटनमधून परतला होता. रशियात दिवसभरात 22,851 नवे रुग्ण सापडले आहेत. लसीकरण सुरू होऊनही देशात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट दिसून आलेली नाही.
फ्रान्समध्ये संसर्ग मंदावला
फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयानुसार दिवसभरात 15 हजार 944 नवे रुग्ण सापडले आहेत. हा आकडा 3 जानेवारीनंतर एका दिवसात सापडलेल्या बाधितामध्ये सर्वात कमी ठरला आहे. तर प्रतिदिन मृतांची संख्याही कमी होत 151 वर आली आहे.









