नाटोच्या भूमिकेबद्दल युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांचा संताप पुन्हा समोर आला आहे. युद्धात आतापर्यंत थेट साथ न मिळाल्याने नाराज झेलेंस्की यांनी युक्रेनला स्वतःच्या आघाडीत स्थान देणार की नाही हे स्पष्ट सांगा असे पाश्चिमात्य देशांना उद्देशून म्हटले आहे. रशियाबद्दल भीती वाटते असे नाटोने जाहीरपणे मान्य करावे. युक्रेनला स्वतःच्या आघाडीत सामील करत आहोत की नाही हे नाटोने जाहीररित्या सांगावे असे झेलेंस्की यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.
अतिरिक्त रणगाडे, विमानांशिवाय मारियुपोलला वाचविणे अशक्य आहे. युक्रेन रशियाच्या क्षेपणास्त्रांना शॉटगन आणि मशीनगन्सनी नष्ट करूश करत नाही. आवश्यक शस्त्रास्त्रांची आम्ही दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत आहोत. युक्रेनला विमाने न मिळाल्यास रशिया शेजारी देशांना धमकावू शकतो असे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
9 मेपर्यंत युद्ध संपणार?
रशिया 9 मेपर्यंत हे युद्ध संपवू इच्छितो असा दावा युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. 9 मे या दिवशीच रशिया दुसऱया महायुद्धात नाझींवरील विजयावरून स्वतःचा विजय दिन साजरा करतो. हा दिवस रशियात सणाप्रमाणे साजरा करण्यात येतो असे युक्रेनच्या अधिकाऱयांचे मानणे आहे.









