ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात आतापर्यंत 10 लाख 97 हजार 251 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 9 लाख 06 हजार 462 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रशियात शनिवारी 6 हजार 065 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 144 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रशियात 1 लाख 71 हजार 450 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2 हजार 300 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 19 हजार 339 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत रशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. रशियात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 69 लाख 67 हजार 403 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात 54 लाख 629 तर ब्राझीलमध्ये ही संख्या 45 लाख 28 हजार 347 एवढी आहे.