ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात मागील 24 तासात कोरोनाचे 4007 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रशियाची चिंता आता वाढली आहे.
रशियात आतापर्यंत 36 हजार 793 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 313 जणांचा मृत्यू झाला आहे. 3057 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. वर्ल्डओमीटर या संकेतस्थळाने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
एका दिवसात कोरोनाचे 4 हजारहून अधिक नवे रुग्ण आढळल्याने रशियाची भीती वाढली आहे.
रशियात आतापर्यंत 1 कोटी 70 लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, या आकडेवारीच्या विश्वासार्हतेविषयी शंका व्यक्त होत आहे. रशियातील लोक लॉकडाऊनचे नियम पळत नसल्यामुळे तेथे कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे सांगण्यात येते.









