ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात आतापर्यंत 12 लाख 60 हजार 112 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 10 लाख 02 हजार 329 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रशियात गुरुवारी 11 हजार 493 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 191 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रशियात 2 लाख 35 हजार 757 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2 हजार 300 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 22 हजार 056 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत रशियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. रशियात आतापर्यंत 4 कोटी 91 लाख 58 हजार 954 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.









