ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहेत. राजधानी मॉस्कोमध्ये लसीकरणासाठी 70 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
‘स्पुटनिक V’ असे रशियाच्या या कोरोना प्रतिबंधक लसीचे नाव आहे. रशियाच्या गमालिया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड यांनी एकत्रितपणे ही लस तयार केली आहे. या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे रशियाने म्हटले आहे. या लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स समोर आले नाहीत. त्यामुळे रशियात लसीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.
येत्या काही दिवसांत स्पुटनिक v लशीचे 20 लाख डोस उपलब्ध होणार आहेत. सध्या कोरोना संसर्गाची बाधा होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्यांना लस दिली जात आहे. डॉक्टर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज संस्थाच्या कर्मचाऱ्यांना लस टोचून घेण्यासाठी वेळ निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.









