वृत्तसंस्था/ दुबई
शनिवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील दुबई खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या अस्लन कारात्सेव्हने एकेरीचे जेतेपद मिळविताना दक्षिण आफ्रिकेच्या हॅरीसचा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
या स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात कारात्सेव्हने हॅरीसचा 6-3, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत एटीपी टूरवरील पहिले विजेतेपद पटकाविले. गेल्या महिन्यात 27 वर्षीय कारात्सेव्हने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पदार्पण करताना ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. कारात्सेव्हला विजयासाठी 80 मिनिटे झगडावे लागले होते. एटीपीच्या ताज्या क्रमवारीत कारात्सेव्ह 42 व्या स्थानावर आहे.









