ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियाचे सुपरफास्ट ‘सोयुझ एमएस -17’ हे यान उद्या (दि.14) सकाळी 8.45 वाजता तीन अंतराळवीरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार आहे. हे सुपरफास्ट यान तीन तासात आयएसएसवर पोहचणार आहे.
कझाकीस्थानमधील बायकोनूर लाँचिंग स्टेशनवरून सोयुझ एमएस -17 झेपावेल. अंतराळवीरांना घेऊन वेगाने प्रवास करणारे सोयुझ पहिलेच अंतराळ यान आहे. अंतराळ स्थानकात अगोदरच गेलेल्या अंतराळवीरांसाठी काही सामान सुद्धा हे यान घेऊन जाणार आहे. 9 एप्रिल 2021 रोजी हे यान पृथ्वीवर परत येईल, असे सांगण्यात येते.
सोयुझ एमएस-17 उड्डाणाचे नेतृत्व क्रू कमांडर सर्गेई रीझीकोव्ह करणार आहे. या प्रवासात ही टीम दोन वेळा बाहेर येऊन सिस्टीम मॅनेजमेंट व भविष्यातील स्पेस वॉकसाठी एअर लॉक लावणार आहे. सोयूझ एमएस 17 अंतराळ स्थानकाला जोडले जावे, म्हणून अंतराळ स्थानकाची उंची 1.7 किमीने कमी केली जाणार आहे.









