ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यांनी स्वतःला सेल्फ क्वारंटईन करून घेतले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मिशुस्तिन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोनाचे निदान होताच मिखाइल मिशुस्तिन यांनी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन त्यांच्या अनुपस्थितीत कामकाजाची धुरा उपपंतप्रधान अँड्री बेलूसोव यांच्याकडे सोपवली. त्यामुळे मिशुस्तिन यांच्या अनुपस्थितीत रशियाचे कामकाज बेलूसोव पाहणार आहेत.
रशियामध्ये आतापर्यंत 1 लाख 6 हजार 498 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1073 जणांचा मृत्यू झाला आहे.11 हजार 619 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 93 हजार 806 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 2300 रुग्णांंची प्रकृृती गंभीर आहे.









