वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियन फुटबॉल संघातील प्रमुख विंगर आंद्रे मोस्टोव्हॉय याला कोरोनाची बाधा झाल्याने तो आता 2021 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत खेळू शकणार नाही. रशियाच्या फुटबॉल संघामध्ये मोस्टोव्हॉयच्या जागी आता येवेगेनेव याची निवड करण्यात आली आहे.
युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रशियाचा सलामीचा सामना शनिवारी सेंट पीटर्सबर्ग येथे बेल्जियम बरोबर होणार आहे. मोस्टोव्हॉयची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्याला आता काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे.









