ओटवणे / प्रतिनिधी:
माजगाव भटवाडी येथील रहिवाशी गंगाबाई आत्माराम सावंत (९०) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत सावंत कुटुंबियांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. माजगाव येथील सावंत आर्ट प्रिंटर्सचे मालक रविकांत सावंत आणि गुरुनाथ सावंत यांच्या त्या मातोश्री होत तर माजी जिल्हा परीषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या त्या सासू होत.









