पर्ये/वार्ताहर
रवींद्र भवन सांखळीने आयोजित केलेला दिपोत्सव कार्यक्रम यंदा मर्यादित स्वरूपात केवळ 1000 पणत्या प्रज्वलित करून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला विशेष अथिती म्हणून एस्सी ओबीसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अनिल होबळे,डिचोलीचे उपजिल्हाधिकारी तसेच रवींद्र भवनचे सदस्य सचिव दिपक वायगणकर,सदस्य स्वाती मायणिकर,दामोदर सातोडकर,सुनिल सिनारी,गोपिनाथ गावस,अजित देसाई,गोकुळदास कामत,मनोहर वळवईकर,राजेंद्र मळीक,अनिल काणेकर,नाझीर शेख,रमेश म्हार्दोळकर तसेच संदेश खोर्जुवेकर,मंगेश चोडणकर हे उपस्थित होते.
सुरुवातीला सदस्यसचिव दिपक वायगणकर यांनी शब्दांनी स्वागत केले.त्यानंतर कार्यक्रम प्रतिनिधी लक्षराज आमोणकर व श्रीनेश हिंदे यांनी मान्यवरांचे फुलांनी स्वागत केले.त्यानंतर समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.’दिवाळीचा दिवा तेल तुपात लाऊ, ज्ञानाच्या ज्योतीला स्नेहाने ओलवु’
या गाण्यांचे स्वर ऐकत पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या. यावेळी विशेष अथिती अनिल होबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नंतर स्वाती मायणीकर,सुनील सिनारी यांनी रवींद्र भवन तर्फे घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली.पुढच्या वषी दिपोत्सवाचा कार्यक्रम अधिक चांगला करू असे सांगण्यात आले. सांखळीतील नगरसेवक दामु घाडी यांना यावेळी श्रद्धा?जली वाहिली.
यावेळी रवींद्र भवन सांखळीने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या ’कुटुंब छायाचित्र’ स्पेर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.यात प्रथम पारितोषिक- दुर्गा बोर्डेकर कुटुंबीय(बोर्डे डिचोली),द्वितीय लता लक्ष्मीकांत शेणवी शेटय़? कुटुंबीय(फुटबा?ल मैदान, हाऊसिंगबोर्ड सांखळी), तृतीय अभय बर्वे व कुटुंबीय(हाऊसिंगबोर्ड का?लनी सांखळी)
उत्तेजनार्थ शशिकला उसपकर कुटुबीय(सांखळी),अमरेश धर्मा ताम्हणकर कुटुंबीय(विठ्ठलापूर सांखळी),बाहुबली शेंदुरे कुटुंबीय(तारा नगर सांखळी),सचिन सुर्यवंशी कुटुंबीय(बोर्डे डिचोली),बाळकृष्ण पाटील कुटुंबीय(रुदेश्वर का?लनी हरवळे सांखळी),मोहन अनंत कुलकर्णी कुटुंबीय(नारायणनगर होंडा सत्तरी),सुनिल मोरजकर कुटुंबीय(हाऊसिंगबोर्ड सांखळी),विष्णू शेटय़? कुटुंबीय(चिमुलवाडा मये डिचोली) या सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.रवींद्र भवन सांखळी येथे पणत्यांच्या प्रकाशात दिपोत्सव कार्यक्रम सुसंपन्न झाला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रताप उग्व?कर यांनी केले.या कार्यक्रमाला रवींद्र भवनचे अध्यक्ष डॉ.प्रमोद सावंत व उपाध्यक्ष विठोबा घाडी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.









