जिल्हय़ात 61 नवे रुग्ण : मच्छे येथील ‘सारी’ रुग्णाचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
रविवारी बेळगाव जिल्हय़ातील 61 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनामुक्त झालेल्या 456 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. मच्छे येथील एका 68 वर्षीय ‘सारी’ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या अधिक आहे.
बेळगाव शहर व उपनगरांतील 29, ग्रामीण भागातील 13 असे तालुक्मयातील एकूण 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळांतून 456 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 23 हजार 935 वर पोहोचली आहे.
यापैकी 22 हजार 89 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 1520 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. लक्षणे नसणाऱया बाधितांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. अद्याप जिल्हय़ातील 31 हजार 887 जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
प्रशासनाला अद्याप 1919 अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील मृतांचा सरकारी आकडा 326 पोहोचला असून गेल्या आठ-दहा दिवसांत बाधितांपेक्षा बरे होणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला पर्यायाने बेळगावकरांना किंचित दिलासा मिळाला आहे.
रविवारी हिंडलगा, काकती, सावगाव, सांबरा, हिरेबागेवाडी, खादरवाडी, ज्योतीनगर, बाळेकुंद्री खुर्द, बेळगुंदी, महाद्वार रोड, महात्मा फुले रोड, माळी गल्ली, नेहरूनगर, रुक्मिणीनगर, सहय़ाद्रीनगर, संगमेश्वरनगर, श्रीनगर, शाहूनगर, सुळगा, टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.









