प्रतिनिधी / पणजी
रविवारी पणजी शहरात नवीन 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. पणजी येथील लॉरडीस अपार्टमध्ये 1, वैद्यकीय कॉलेजजवळील सनफ्लॉवर इमारतीत 1, करंझाळे येथीव ब्लू डे हॉटेलजवळ 3, मिरामार येथे 1, व आल्तिनो येथील निर्मला इंन्स्टिटय़ूट जवळील सावित्री बंगलो येथे 1 कोरोना रुग्ण सापडले आहेत. अशी माहीती पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
लॉरडीस अपार्टमध्ये, व वैद्यकीय कॉलेजजवळील सनफ्लॉवर इमारतीत मिळालेले रुग्ण हे गृहीणी आहेत. करंझाळे भागात मिळालेला एक रुग्ण शारदा मंदीर विद्यालयाचा सुरक्षा मॅनेजर आहे, व दोन विद्यार्थी आहेत. तर आल्तिनो येथील एक वृध्द सदस्य आहे. असेही मडकईकर यांनी पुढे सांगितले.









