ऑनलाईन टीम / पुणे :
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ‘आरपीआय’ पक्षाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाचे आणि मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
येत्या रविवारी (दि. २ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता शनिवार पेठेतील नारायण पेठ पोलिस चौकी नजीकच्या अमन प्रेस्टिज येथे हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. खासदार गिरिष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ आदी मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या प्रसंगी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे., अशी माहिती पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव आणि राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी यांनी दिली.









