साहित्य : 1 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, 1 वाटी पाणी, 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हिंग, 3 हिरव्या मिरच्या चिरून, 4 कढीपत्ता पाने, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा लिंबूरस, पाव चमचा खाण्याचा सोडा, 2 चमचे तेल
कृती : बाऊलमध्ये बेसन, रवा घेऊन त्यात मीठ, साखर, लिंबूरस आणि हिंग मिक्स करावे. नंतर त्यात पाणी मिक्स करून मिश्रण चांगले फेटावे. आता त्यात खाण्याचा सोडा मिक्स करावा. कुकरमध्ये बसेल असा डबा घेऊन त्याला तेलाचा हात लावावा. नंतर त्यात तयार बेसन-रव्याचे मिश्रण ओतून झाकण लावावे. आता कुकरमध्ये नेहमीप्रमाणे पाणी ओतून डबा त्यात ठेवावा. कुकरची शिट्टी बाजूला काढून झाकण लावावे. पंधरा मिनिटांनी झाकण काढून कुकर गार झाला की डबा बाहेर काढावा. आता कढईत गरम तेलात मोहरी टाकून तडतडावी. नंतर त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता टाकून फोडणी करावी. तयार फोडणी ढोकळय़ावर टाकून खाण्यास द्या.









