साहित्यः
उपमासाठीः 2 चमचे तेल, 1 हिरवी मिरची चिरून, 1 इंच आलं खिसून, 1 कांदा चिरून, 1 गाजर खिसून, पाव चमचा हळदपूड, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 2 चमचे मटार, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर, चवीपुरते मीठ, 1 वाटी पाणी, अर्धी वाटी रवा, 2 चमचे कोथिंबीर चिरून, इतरः पाव वाटी कॉर्नफ्लोर, पाव चमचा काळीमिरीपूड, 1 वाटी बेडक्रम्स, पाव चमचा मीठ, पाव वाटी पाणी, 7 काजू, तेल तळण्यासाठी
कृतीः
उपमाचे साहित्य मिक्स करून उपमा बनवून घ्यावा. बाऊलमध्ये कॉर्नफ्लोर, काळीमिरीपूड, मीठ आणि पाणी घालून बॅटर बनवावे. आता बनवलेल्या उपम्याची छोटी टिक्की बनवून कॉर्नफ्लोरच्या मिश्रणात घोळवावी. नंतर बेडक्रम्समध्ये घोळवून त्याच्या मधोमध अख्खा काजू ठेवून हलक्यावर दाब द्यावा. तयार कटलेट गरम तेलात सोनेरी रंगावर तळावेत. अथवा ओव्हनमध्ये 180 डिग्रीवर 25 मिनिटे बेक करावे. आता तयार रवा कटलेट टोमॅटो सॉससोबत खाण्यास द्यावे.









