सबसीडी मिळविण्यासाठी शेतकऱयांचे केंद्राकडे हेलपाटे, कृषी अधिकाऱयांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने गोची
प्रतिनिधी / बेळगाव
शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना कोणत्याही योजनेची योग्य माहिती देण्यासाठी रयत संपर्क केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून शेतकऱयांना कोणत्याच योजनांची माहिती मिळत नाही. त्यामुळे शेतकऱयांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुरुवातीच्या काळात योग्य प्रकारे माहिती देण्यात येत होती. मात्र आता ही केंदेही कुचकामी ठरत असल्याचे अनेक शेतकऱयांनी सांगितले. याकडे आता लक्ष देण्याची मागणी होत आहे.
प्रत्येक शेतकऱयाला आता रयत संपर्क कार्यालयाला भेट देऊन आपली नोंदणी करून घ्यावी लागत असली तरी तेथेही विविध योजनांतून मिळणारे अनुदान मिळवून घेण्यासाठी शेतकऱयांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आता यापुढे तरी कृषी खात्याने शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य प्रकारे माहिती देणे गरजेचे बनले आहे. शेतकऱयांना कोणत्याही योजना किंवा इतर माहिती हवी असल्यास तालुक्मयातील चार ठिकाणी या रयत संपर्क कार्यालयांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र त्या केंद्रांवर योग्य माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याकडे लक्ष द्यावे, असेही बोलले जात आहे.
कार्यालयांना संपर्क साधून नावे नोंदणीचे आवाहन
ज्या ठिकाणी ही केंदे आहेत त्या त्या विभागातील शेतकऱयांनी अखत्यारित येणाऱया कार्यालयांना संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत, असे आवाहनही करण्यात आले असले तरी ही केंद्रे कधी सुरू, कधी बंद तर कधी सर्व्हरडाऊनमुळे शेतकऱयांना त्रासदायकच ठरू लागल्याचे सांगण्यात येत आहे. कृषी खात्याच्यावतीने विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र या योजनांची माहिती शेतकऱयांपर्यंत पोहोचत नाही. याचा विचार करून शेतकऱयांनी आता एक ऍप सुरू केले आहे. या ऍपवर कोणाला सबसीडी मिळाली आहे, याची सविस्तर माहिती देण्यात येणार होती, असे सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नसल्याचे दिसून येत आहे.
कृषी ऍपकडेही शासनाचे दुर्लक्ष
कृषी ऍपची जनजागृती करण्याकडे कृषी खात्याने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे तरी याची दखल घेऊन शेतकऱयांना सोयीचे होईल, या दृष्टीने पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. नावे नोंदणीसाठी आधारकार्ड, उतारा, जात प्रमाणपत्र तसेच दोन छायाचित्रे आणि बँक पासबुकचे झेरॉक्स आणून संपर्क कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. बेळगाव जिल्हय़ात नुकताच महापूर येऊन गेला आहे. याचा सर्व्हे करण्याच्या नावाखाली कृषी अधिकारी फिरतीवरच आहेत. त्यासाठी बेळगाव तालुक्मयातील उचगाव, बेळगाव येथील शिवाजीनगर, हिरेबागेवाडी आणि काकती रयत संपर्क कार्यालयात संबंधित ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील शेतकऱयांनी संपर्क साधावा, असे सांगून हात वर केले आहेत. मात्र यामध्ये शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणात अडचणी येत असून त्या सोडविण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे.









