प्रतिनिधी / सांगली
येथील दि रयत बँक एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोक माने कासेगाव तर उपाध्यक्षपदी सुकुमार परीट म्हैसाळ यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक उर्मिला राजमाने यांनी काम पाहिले. संस्थेचे कुटुंबप्रमुख डि.के. पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालक व सेवक वर्ग उपस्थित होता.








