बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांना बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील गोकक येथील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांना कोरोनाची लागण झाल्याने लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहता आले नाही. आता त्यांना डिस्चार्ज मिळाल्याने त्यांना गोकाक येथील त्यांच्या घरी हलविण्यात आले.
दरम्यान रविवारी रात्री त्यांना श्वास घेण्यास अडचण आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जारकिहोळी यांच्यावर एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.









