प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कायदा मंत्री अड. रमाकांत खलप यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त गौरव समारंभ व गौरव ग्रंथाचे प्रकाशन येत्या शुक्रवारी 1 आक्टोबर रोजी पुणे येथे पद्मश्री विखे पाटील फाऊंडेशन सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित केले आहे.
पुणे येथील खलप यांच्या चाहत्यांनी पद्मश्री विखे पाटील फाऊंडेशन, संवाद पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणाऱया या गौरव सोहळय़ाला मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती असेल. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डा?. पी. डी. पाटील व ज्येष्ट पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत.
अड. रमाकांत खलप यांच्या गोव्यातील तसेच देश पातळीवरील राजकीय, सामाजिक व साहित्यकि कामगिरीचा तथा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण आढावा घेणारा ’भाईः अड. रमाकांत खलप अमृतमहोत्सवी गौरव ग्रंथ’ पत्रकार प्रभाकर ढगे यांनी संपादित केला आहे. गोवा, महाराष्ट्र व नवी दिल्ली येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अ?ड. रमाकांत खलप यांच्या अनेक पैलू?वर या ग्रंथात लेखन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रमाकांत खलप यांच्या सर्व चाहत्यांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन कार्यक्रम संयोजक डा. अशोक विखे पाटील, सुनील महाजन व सचिन ईटकर यांनी केले आहे.









