प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 28 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ॲन्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेला रुग्णाचे प्रयोगशाळेतील टेस्टही पॉझिटिव्ह आली. दोन्ही ठिकाणी एका रुग्णाचे नाव आल्याने एक आकडा वगळण्यात आला असून यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1774 झाली आहे. दरम्यान 24 रुग्णांनाबरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1193 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हीड रुग्णालय 6, समाज कल्याण 6, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 6, कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल मधील 6 रुग्ण आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे वितरण खालील प्रमाणे
रत्नागिरी- 14 रुग्ण
कामथे- 14 रुग्ण
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1774
बरे झालेले – 1193
मृत्यू – 59
एकूण पॉझिटिव्ह – 522
सद्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 522 झाली आहे. आज झापडेकर चाळ, रत्नागिरी, हिलटॉप अर्पाटमेंट, शिवाजीनगर, रत्नागिरी, किर्तीनगर, रत्नागिरी, गोडबोले स्टॉप, रत्नागिरी, वैभवनगर अपार्टमेंट आंबेडकरवाडी, रत्नागिरी, हॉटेल लँडमार्क शिबापॅलेस रोड, रत्नागिरी, मौजे गणेशगुळे, शिंदेवाडी रत्नागिरी, मौजे नाचणे संभांजीनगर, रत्नागिरी, टीआरपी, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









