वादळ सदृश्य वातावरण निवळले, बंदर पुन्हा एकदा गजबजले
वार्ताहर / हर्णे
अरबी समुद्रात गेले काही दिवस असणारे वादळ सदृश्य वातावरण निवळल्यानंतर वादळाच्या इशाऱ्या मुळे गेले चार दिवस बंद राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सर्व बंदरातील व विशेषतः हर्णे बंदरातील मासेमारीला पुन्हा सुरवात झाली आहे. आंजर्ले, जयगड खाडीतील नौकाही पुन्हा समुद्रात गेल्या असल्याने हर्णे बंदर पुन्हा गंबजलेले दिसणार आहे.
आता वाऱ्याचा जोर ओसरला असल्याचा अंदाज घेऊन येथील मच्छीमारांनी कालपासून पुन्हा मासेमारीला सुरवात केली आहे. काल हर्णे बंदरात नौकांवर डिझेल, बर्फ पाणी भरण्यासठी मच्छीमारांची लगबग सुरू होती. त्यामुळे हर्णे बंदर पुन्हा एकदा गजबजलेले दिसणार आहे.









