प्रतिनिधी / खेड
घरात एकटी असल्याची संधी साधत १२ वर्षीय अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गावातीलच रोशन रामचंद्र खेराडे (वय ३०, रा. सोनगाव-ब्राह्मणवाडी) या नराधमास येथील पोलिसांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.
ही घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली होती. आठवडाभरातील अल्पवयीन युवतीवरील लैंगिक अत्याचाराची तालुक्यातील दुसरी घटना आहे. पीडित युवतीच्या घरातील माणसे कामावर गेल्यानंतर ती शेजारी गेली होती. याचदरम्यान, नराधम हा पीडित युवतीच्या घरात लपून बसला होता. युवती घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास तिला ठार मारण्याची धमकी केली होती. याबाबत पीडित युवतीच्या कुटुंबियांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. हा नराधम विवाहित असून त्याची पत्नी गर्भवती आहे.









